ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने डोके बराच वेळ ओले राहते. त्यामुळे कोंडा होऊ शकतो.



केस धुतल्यानंतर ते टॉवेल गुंडाळल्याने स्कॅल्पला फंगल इंफेक्शन (Fungal infection) होऊ शकते.



ज्यांना केस गळण्याची (Hair Fall) समस्या आहे त्यांनी ओल्या केसांना चुकूनही टॉवेल गुंडाळू नये. कारण ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळल्यानं केस तुटतात.



ओल्या केसांना टॉवेल बांधल्याने केसांची मुळे कमकुवत होतात तसेच केस गळण्याची समस्याही वाढते.



ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसांचा नॅचरल शाइन निघून जातो. तसेच केस कोरडे होऊ शकतात.



आठवड्यातून 2-3 वेळा केसांना तेलाने मसाज करावा. तसेच आठवड्यातून 2-3 वेळा केस स्वच्छ धुवावेत.



2-3 पेक्षा जास्त वेळा केस धुवू नका. कारण सतत केस धुतल्यानं शॅम्पूमुळे केस कोरडे होतात.



केसांची निगा (Hair Care) राखणे अत्यंत गरजेचे असते.



केसांवर विविध प्रोडक्ट्सचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा (Hair Care Tips). केमिकल्स असणारे शॅम्पू, कंडिशनर वापरणे टाळावे.



चेहऱ्यावर टॉवेल घासल्याने तुमच्या त्वचेचं नुकसान होतं. चेहऱ्यावर टॉवेल घासल्यानं त्वचेच्या पेशींचं नुकसान होतं.