शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक तत्वांची मुबलक प्रमाणात आवश्यकता असते आणि पोषक तत्वांची गरज भागवण्यासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे.



कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन ए, बी6, डी, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयोडीन यांसारखे पोषक घटक दुधात आढळतात.



आयुर्वेदानुसार, दह्याचे दुधाबरोबर कधीही सेवन करू नये. तसेच, दूध प्यायल्यानंतर दहीही खाऊ नये.



दुधाबरोबर दही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुम्हाला पोटाची समस्या होऊ शकते.



दुधाबरोबर आंबट फळे खाणेही टाळावे. दूध आणि लिंबूवर्गीय फळे एकत्र सेवन केल्यास पोटदुखी आणि उलट्या होऊ शकतात.



मासे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण, आपण नेहमी दुधासह माशांचं सेवन टाळावे.



यामुळे, तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या जसे की, पोटदुखी आणि अन्न विषबाधा होऊ शकते.



दुधाबरोबर मसालेदार पदार्थ खात असाल तर आतापासून तसं करणं थांबवा. कारण यामुळे अ‍ॅसिड रिफ्लक्सचा धोका तसेच अपचनाचा त्रास होऊ शकतो.



चिप्ससारख्या सॉल्टेड स्नॅक्ससोबत दूध पिण्याची चूक करू नका. कारण त्यात भरपूर मीठ मिसळले जाते, ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलन बिघडू शकते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.