फळं खाणं आरोग्यसाठी अतिशय फायदेशीर असतं, हे सर्वांनाच ठाऊक आहे. फळं खाणं प्रत्येकालाचा आवडतं. अनेकदा लोक फळांचं सॅलड बनवून खातात.
यावेळी बहुतेक जण फळांवर मीठ, साखर किंवा चाट मसाला टाकून फळं खातात. यामुळे फळांची चव वाढते.
आपण अनेकदा काकडी, कांदा आणि गाजर यांचं सॅलड बनवत यावरही मीठ किंवा चाट मसाला टाकून खातो.
जर तुम्हालाही कापलेली फळं वरून साखर, मीठ किंवा चाट मसाला घालून खायला आवडत असतील तर काळजी घ्या. अशा प्रकारे फळांचं सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कापलेल्या फळावर मीठ शिंपडले की ते पाणी सोडू लागते. यामुळे फळांमधील पोषक तत्वे निघून जातात.
त्याचबरोबर मीठ किंवा चाट मसाल्यामध्ये असलेले सोडियम किडनीवर परिणाम करते.
फळ नैसर्गिकरित्या गोड असतात. फळांमध्ये ग्लुकोज असते. यामुळे फळांचे सेवन केल्याने शरीरात कॅलरीज वाढतात.
अशात तुम्ही फळांवर अधिक साखर टाकून खाल्याने शरीरात साखरेचं प्रमाण वाढते. यामुळे मधुमेहाची समस्या उद्भवू शकते.
शिवाय शरीरातील साखरेचं प्रमाण वाढण्यासह वजनही वाढू शकते. डायबेटीजच्या रुग्णांसाठी हे फारच नुकसानदायक आहे.