'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतील स्वरा आणि वैदेही खऱ्या आयुष्यातही मायलेकी झाल्या आहेत.



उर्मिला आपल्या लेकीप्रमाणेच म्हणजेच जिजाप्रमाणे स्वराची काळजी घेते.



उर्मिलाची लेक म्हणजेच जिजा देखील बऱ्याचदा 'तुझेच मी गीत गात आहे'च्या सेटवर जात असते.



आता जिजा आणि स्वरामध्येही छान गट्टी जमली आहे. या दोघींचीही सेटवर धमाल सुरु असते.



इतक्या लहान वयातही स्वरामध्ये असलेला समजूतदारपणा उर्मिलाला विशेष भावतो.



खरंतर जिजामुळेच मला स्वराची आई साकारणं शक्य झाल्याचं उर्मिला सांगते.



दोन हिंदी मालिका आणि एका मराठी सिनेमात अवनीने बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.



अभिनेता अभिजीत खांडकेकर मालिकेत सुप्रसिद्ध गायक मल्हारची भूमिका साकारत आहे