बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आज (16 मे) आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे.



अल्पावधीतच त्याने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला.



एक काळ असा होता जेव्हा, त्याच्या वडिलांची इच्छा होती की, त्याने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून नोकरी करावी.



तो मुंबईतील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून शिकत होता.



या अभ्यासक्रमादरम्यान तो एकदा एका आयटी कंपनीत इंडस्ट्रीयल व्हिजीटसाठी गेला होता.



तिथे पोहोचल्यानंतर विकीला समजले की, तो या ऑफिसच्या कामासाठी बनलेलाच नाही.



इंजिनिअर म्हणून नोकरी नाकारल्यानंतर, त्याने चित्रपटांमध्ये करिअर करण्याचा निश्चय केला.



यानंतर अभिनय शिकण्यासाठी विकी कौशलने ‘किशोर नमित कपूर अकादमी’मध्ये प्रवेश घेतला.



बॉलिवूडमध्ये अभिनेता होण्यापूर्वी विकी कौशलने 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.



विकी दिग्दर्शक अनुराग कश्यपला आपला गुरू मानतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच त्यांने थिएटर करायला सुरुवात केली.