कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त असणे यालाच उष्णतेची लाट येणं म्हटलं जातं.



अशा उच्च तापमानामुळे निर्माण होणारी परिस्थिती आणि अति आर्द्रतेमुळे लोकांच्या शरीरावर हानिकारक परिणाम होतो, यामुळे मृत्यू देखील होतो.



थकवा येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होणं, उलटी होणे, अस्वस्थ वाटणे, रक्तदाब वाढणे ही उष्माघाताची काही लक्षणे आहेत.



थकवा आणि हीट स्ट्रोक अर्थात उष्माघातामधील मुख्य फरक असा की हीट स्ट्रोकमध्ये घाम येत नाही.



तापमान अधिक वाढल्याने उन्हात बाहेर पडणं टाळा. घराबाहेर पडणं गरजेचं असल्यास छत्रीचा वापर करा. टोपी किंवा रुमालाने डोकं झाका. हलके आणि सुती कपडे परिधान करा.



हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज 500 मिली जास्त असते. त्यामुळे जरी तहान लागली नाही तरी जास्त प्रमाणात पाणी प्या.



चहा, कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंकऐवजी ओआरएस, लिंबू सरबत, ताक आदी पेय प्या, जेणेकरुन शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवता येऊ शकतं.



त्यामुळे भरपूर पाणी प्या, जेणेकरुन शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राहिल.