बुर्ज खलिफा पाहण्यासाठी किती पैसे लागतात?

Image Source: pixabay

दुबईत स्थित बुर्ज खलिफा जगातील सर्वात उंच इमारत आहे

Image Source: pixabay

जवळपास 828 मीटर उंचीसह ही जगातील सर्वात उंच मानवनिर्मित इमारत आहे

Image Source: pixabay

बुर्ज खलिफामध्ये एकूण १६३ मजले आहेत, तर ते बांधण्याचे काम २००४ मध्ये सुरू झाले, जे २०१० मध्ये पूर्ण झाले.

Image Source: pixabay

आणि याच इमारतीला पाहण्यासाठी जगभरातून लोक दुबईला जातात.

Image Source: pixabay

अशा परिस्थितीत, चला तर, आता तुम्हाला बुर्ज खलिफा पाहण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात, हे सांगतो.

Image Source: pixabay

बुर्ज खलिफामध्ये अनेक अपार्टमेंट, ऑफिसेस आणि हॉटेल्स आहेत, जिथे वेगवेगळ्या मजल्यांवर जाण्यासाठी तिकीट लागते.

Image Source: pexels

बुर्ज खलिफाच्या व्हीआयपी लॉंजला भेट देण्यासाठी AED 769 म्हणजे भारतीय रुपयात 17 हजार 957 रुपयांचे तिकीट घ्यावे लागते

Image Source: pexels

जर तुम्ही बुर्ज खलिफाच्या माथ्यावर जाऊन रेस्टॉरंट आणि पूलचा आनंद घेऊ इच्छित असाल, तर त्यासाठी तुम्हाला AED 322 द्यावे लागतील.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, जर तुम्हाला बुर्ज खलिफाच्या सर्वात वर स्काय व्ह्यूमध्ये जायचे असेल, तर तुम्हाला AED 179 म्हणजे 4 हजार 180 रुपये द्यावे लागतील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels