1 जून रोजी संपूर्ण जगभरात दूध दिवस साजरा केला जातो.



दुधाचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो.



लोकांपर्यंत दुधाचा प्रचार आणि प्रसार करणं हा या दिवसाचा उद्देश आहे.



सर्वात पहिला दूध दिवस 1 जून 2001 रोजी साजरा करण्यात आला होता.



जागतिक अन्न व कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001 पासून दरवर्षी 1 जून रोजी संपूर्ण जगात दूध दिवस साजरा केला जातो.



अनेक देशांमध्ये 1 जून रोजीच दुग्ध दिवस साजरा केला जात असे.



त्यामुळे 2001 सालापासून 1 जून या तारखेलाच दूध दिन साजरा करण्यात येऊ लागला.



हा दिवस साजरा करण्याचा उद्देश दुधाच्या सर्व पैलूंच्या बाबतीत सामान्य जनतेमध्ये जागरुकता पसरवणं आणि वाढवणं असा आहे.



तसंच लोकांना दुधाच्या बाबतीत अधिक ज्ञान मिळू शकेल, जेणेकरुन दुधाचं आपल्या आयुष्यातील महत्त्व लोकांना पटेल.



दुधाचं उत्पादन, दुधाच्या पौष्टिकतेचं महत्त्व आणि दुधाच्या विविध उत्पादनांसह याचं आर्थिक महत्त्व समजावलं