वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चष्म्यामुळे तुमच्या गाडीला आग लागू शकते. हो, हे ऐकून तुम्हांला नवल वाटेल पण हे खरं आहे.



अनेक वेळेस जणांना चष्मा किंवा सनग्लासेस कारच्या डॅशबोर्डवर ठेवण्याची सवय असते. पण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते.



गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेल्या चष्म्यामुळे गाडीला आग लागू शकते. त्यामुळे गाडी चालकांनी याबाबतीत खबरदारी बाळगण्याची गरज आहे.



इंग्लंडमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीनं गाडी उन्हात पार्किंगमध्ये उभी केली होती. या गाडीला अचानक आग लागली.



कार पार्किंगमध्ये उन्हात उभी होती, कारच्या डॅशबोर्डवर सनग्लासेस ठेवलेले होते. सनग्लासेसच्या लेन्स सूर्यकिरणांना एकाच ठिकाणी केंद्रित करतात.



तुम्ही लहानपणी हा प्रयोग नक्की केला असेल. भिंग वापरून उन्हाची किरण कागदावर एका ठिकाणी पडतात आणि त्यामुळे कागद जळतो.



शाळेत आपण केलेल्या याचप्रयोगाप्रमाणे डॅशबोर्डवर ठेवलेला चष्मा गाडीला आग लागण्याचं कारण ठरला.



गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेल्या सनग्लासेसच्या लेन्समधून सूर्यप्रकाश कारच्या विंडशील्डवर केंद्रित झाला.



यामुळे विंडशील्ड इतकी गरम झाली की, आग लागली आणि काच वितळली आणि डॅशबोर्डवर पडली.



गरम काचेने डॅशबोर्डचा काही भागही जळाला. यादरम्यान सूर्यप्रकाशामुळे आग आणखी भडकली आणि गाडीला आग लागली.