अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियात प्रिन्स शुभमन गिल याचे कमबॅक झाले आहे. शुभमन गिल याचे कमबॅक झाल्यामुळे भारतीय संघाची (Team India) ताकद आणखी वाढली आहे. वर्षभरात गिल याने 1200 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. आता गिल परतल्यामुळे टीम इंडियाला दहा हत्तीचे बळ आले आहे. मागील वर्षभराची आकडेवारी पाहिल्यास शुभमन हा टीम इंडियाचा सर्वोत्तम खेळाडू आहे. गिलने आतापर्यंत खेळलेल्या 35 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1917 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 6 शतके आणि 9 अर्धशतके केली आहेत. शुभमन गिल याचा स्ट्राईक रेटही 102.84 इतका आहे. डेंग्यूचा सामना केल्यानंतर तो मैदानात परतला आहे.