अहमबाद येथे सुरु असलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने शानदार खेळी केली. त्याचे अर्धशतक हुकले, पण त्याने ऑसी गोलंदाजाची धुलाई केली. नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा प्रथम फलंदाजीला आला. त्याने आपल्या स्टाईलने फटकेबाजी केली. रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा केल्या. या छोटेखानी खेळीत रोहित शर्माने तीन षटकार आणि 4 चौकार ठोकले. रोहित शर्माने छोटेखानी खेळीत मोठा विक्रम नावावर केलाय वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर झालाय. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 87 षटकार ठोकलेत. रोहितपूर्वी वनडेत एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर होता. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध वनडेत 85 षटकार मारले होते.