जगभरात चहाप्रेमी प्रमाणेच कॉफी प्रेमींची संख्याही फार मोठी आहे प्रत्येक ठिकाणच्या कॉफीची चव आणि किंमतही वेगवेगळी आहे. पण तुम्हाला जगातील सर्वात महाग कॉफीबाबत माहिती आहे का? जगातील सर्वात महाग कॉफी जाकू बर्ड कॉफी नावाने प्रसिद्ध आहे. ही कॉफी जाकू पक्षाच्या विष्ठेपासून तयार केली जाते. जाकू बर्ड कॉफीची किंमत सुमारे 1000 डॉलर प्रतिकिलो आहे म्हणजेच या एक किलो कॉफीसाठी तुम्हाला सुमारे 81000 रुपये खर्च करावे लागतील. ही सर्वात महागडी कॉफी ब्राझीलमध्ये तयार केली जाते. येथूनचं याची जगभरात निर्यात केली जाते ही कॉफी चांगलीच लोकप्रिय झाली. सध्या ही कॉफी जगातील सर्वात महागडी कॉफी म्हणून ओळखली जाते.