जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर वर्चस्व गाजवणारी सेरेना विल्यम्सला (Serena Williams) विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेबाहेर पडली.
विम्बल्डन 220 च्या स्पर्धेतील पहिल्या फेरीत फ्रान्सच्या हार्मनी टॅनविरुद्ध (Harmony Tan) विल्यम्सला 7-5, 1-6, 7-6 (10-7) असा पराभव स्वीकारावा लागला.
40 वर्षीय सेरेनानं 364 दिवसांनंतर महिला एकेरीच्या सामन्यात पुनरागमन केलं होतं.
विम्बल्डनमध्ये जागतिक क्रमवारीत 115 व्या स्थानावर पदार्पण करणाऱ्या फ्रान्सच्या हार्मोनी टेनविरुद्धच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात तिला अखेर 7-5, 1-6, 7-6 (10-7) असा पराभव पत्करावा लागला.
गुरुवारी दुसऱ्या फेरीत टेनचा सामना 32व्या मानांकित स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्मोशी होईल, जिनं पहिल्या फेरीत अमेरिकेच्या क्रिस्टीना मॅकहेलचा 6-2, 6-1 असा पराभव केलाय.
सेरेनानं तिचा शेवटचा एकेरी सामना गेल्या वर्षी 29 जून रोजी विम्बल्डनमध्ये खेळला होता, पण पहिल्या सेटमध्येच दुखापतीमुळे ती बाहेर पडली होती.
विम्बल्डनमध्ये सात वेळा माजी चॅम्पियन राहिलेल्या 40 वर्षीय सेरेनाने विजयाची नोंद करताना दोन गुणांची प्रगती केली.
विल्यम्सनं सहा वर्षांपूर्वी तिच्या सात विम्बल्डन एकेरी विजेतेपदांपैकी शेवटचे विजेतेपद जिंकले. पण 2018 आणि 2019 मध्ये तिला फक्त अंतिम फेरीत प्रवेश करता आला.