आयर्लंडविरुद्ध डबलिनच्या द व्हिलेज स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं चार धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं 2-0 नं मालिका जिंकली.



या मालिकेत भारताचा युवा फलंदाज दीपक हुडानं चमकदार कामगिरी करून दाखवली आहे.



पहिल्या सामन्यात 47 धावांची खेळी केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात शतक झळकावून त्यानं खास विक्रमाला गवसणी घातलीय.



भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणार तो चौथा फलंदाज ठरलाय.



याआधी रोहित शर्मा, सुरेश रैना आणि केएल राहुलनं भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात शतक ठोकलंय.



दुसऱ्या टी-20 मध्ये दीपकला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यानं 57 चेंडूत 104 धावा केल्या. दीपकच्या खेळीत 9 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे.



भारतासाठी टी-20 सामन्यात शतक झळकावणारा तो चौथा खेळाडू ठरलाय.



आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चार शतक झळकावण्याचा विक्रम भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे.



त्यानंतर केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर दोन शतकांची नोंद आहे.



भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाहीनं टी-20 क्रिकेटमध्ये एक शतक ठोकलंय. या यादीत आता दीपक हुडाचा समावेश झालाय.