देशात तसेच परदेशातही ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिसमस दरवर्षी २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ख्रिसमस ट्री ची अतिशय सुंदर सजावट केली जाते. ख्रिसमस ट्री सजवणे इतके महत्त्वाचे का? आणि ही परंपरा कशी सुरू झाली? जाणून घ्या काय आहे या मागचा इतिहास. असे मानले जाते की ख्रिसमस ट्रीची सुरुवात १६व्या शतकातील ख्रिश्चन सुधारक मार्टिन ल्यूथर यांनी केली होती. ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा जगात सर्वप्रथम जर्मनीमध्ये सुरू झाली. मार्टिन ल्यूथरने हे झाड त्यांच्या घरी लावले. आणि येशू ख्रिस्ताच्या वाढदिवसानिमित्त या झाडाला मेणबत्त्या आणि इतर वस्तुंनी सजवले होते. तेव्हा पासून ख्रिसमस ट्री सजवण्याची प्रथा पडली अशी मान्यता आहे.