सर्वांच्याच घरी लिंबाचा वापर केला जातो. वेग वेगळ्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. लिंबू एसिडीक असल्याने ते योग्य तापमानात स्टोअर करावे लागतात. अन्यथा लिंबू लवकर खराब होण्याची शक्यता असते. लिंबू स्टोर स्टोअर करताना या गोष्टींची काळजी घ्यावी. फ्रिजमध्ये लिंबू ठेवल्यानंतर ते काही दिवसांनी सुकतात किंवा काळे पडतात. लिंबू महिनोंमहिने ताजे रहावेत यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करू शकता. लिंबू जास्त दिवस चांगले ठेवण्यासाठी पाण्याने भरलेल्या काचेच्या भांड्यात ठेवा. सगळे लिंबू पाण्याने भरलेल्या जारमध्ये ठेवल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरून अनेक दिवस लिंबू ताजे आणि रसाळ राहतील.