जगभरातील स्वयंपाकघरात दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कापल्या जातात. यामध्ये कांद्याचाही समावेश केला जातो.

जेवणातील प्रत्येक पदार्थांत कांद्याचा वापर केला जातो. जसे की, डाळ, भाजी, भजी, पुलाव भात इ...

कांद्यामध्ये असे कोणते गुणधर्म असतात ज्यामुळे डोळ्यांतून पाणी येतं?

कांदा कापताना डोळ्यांतून अश्रू तर येतातच, पण त्यामुळे डोळ्यांना तीव्र जळजळ आणि खाज सुटू लागते.

कांद्यामध्ये सायन-प्रोपॅनिथियल-एस-ऑक्साइड नावाचे रसायन असते. या रसायनामुळे डोळ्यांत पाणी येते.

डोळ्यांच्या अश्रू ग्रंथींवर त्याचा परिणाम होतो, त्यामुळे डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात.

जेव्हा आपण कांदा कापतो किंवा सोलतो तेव्हा त्यात असलेले लॅक्रिमेट्री-फॅक्टर सिंथेस एन्झाइम हवेत मिसळते.

कांद्यामुळे डोळ्यांच्या अश्रू ग्रंथीवर परिणाम होतो आणि डोळ्यांत जळजळ आणि अश्रू येऊ लागतात.

कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, सी आणि ई चांगल्या प्रमाणात आढळतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.