रिकाम्या पोटी कधीही दुधाचे सेवन केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.

रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होतो.

लहान मुलांच्या बाबतीत असे होत नाही, ते दिवसाच्या कोणत्याही वेळी दूध पिऊ शकतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्येष्ठांनी रात्री झोपण्यापूर्वी सुमारे एक तास आधी दुधाचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया सुधारण्यासोबतच अनेक आजारांपासून आराम मिळतो.

जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या असेल तर रात्री फक्त दूध घ्या. याचा फायदा तुम्हाला मिळेल.

एक ग्लास कोमट दूध तुमचा दिवसभराचा थकवा दूर करेल. तसेच तुम्हाला चांगली आणि गाढ झोपही लागेल.

दुधात हळद मिसळून वापरणे आरोग्यासाठी चांगले आहे.

आयुर्वेदात रात्री दूध पिणे खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. मात्र, दुपारच्या जेवणासोबत दूध पिऊ शकतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.