बँकिंग, विमा किंवा इतर व्यवहारांसाठी Cancelled Cheque मागितले जातात.



डिजिटल युगात Cancelled Cheque का मागितले जातात असा प्रश्न अनेकांना पडतो.



कार लोन, होम लोन अथवा पर्सनल लोन घेण्यासाठी गेल्यानंतर तुमच्याकडे कॅन्सल चेक मागितला जातो.



पीएफ खात्यामधून ऑनलाइन पैसे काढत असाल तरिही कॅन्सल चेकची गरज भासते.



म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना तुमच्याकडे कॅन्सल चेक मागितला जातो.



कॅन्सल चेकसाठी नेहमी ब्लॅक अशता ब्लू इंक असलेल्या पेनाचा वापर करावा.



एखाद्याला कॅन्सल चेक देता, तेव्हा त्यावर सही करण्याची गरज नाही. फक्त चेकवर कॅन्सल लिहावं लागते.



संबंधित व्यक्तीचे बँक खाते व्हेरिफाय करण्यासाठी कॅन्सल चेक घेतला जातो.



कॅन्सल चेक देण्याचा अर्थ बँकमध्ये तुमचं खातं आहे. चेकवर तुमच्या खात्याचा क्रमांक असतो.



बँकेच्या ब्रांचचा आयएफसी (IFSC) कोडही लिहिलेला असतो. त्यावरुन बँक अथवा कंपन्या तुमचं खात व्हेरियफाय करते.



कॅन्सल चेकद्वारे कुणीही तुमच्या खात्यावरुन पैसे काढू शकत नाही.