जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.

जान्हवी कपूर सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

जान्हवी माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नातवाला म्हणजेच शिखर पहाडियाला डेट करत आहे.

जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याच्या पार्टीमध्ये जान्हवी आणि शिखर स्पॉट झाले.

अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये जान्हवीने गुलाबी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. जान्हवी आणि शिखरने एकत्र पार्टीत एन्ट्री केली आहे.

साखरपुड्याच्या पार्टीआधी जान्हवी आणि शिखर बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत स्पॉट झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून शिखर आणि जान्हवी रिलेशनमध्ये होते. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला.

आता पुन्हा ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.