संपूर्ण जगाच्या नजरा 14 जानेवारी रोजी होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2022 स्पर्धेकडे लागल्या आहेत.
या स्पर्धेत भारताकडून दिविता रायचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी.
दिविता रायचा जन्म 10 जानेवारी 1998 रोजी मंगळूर येथे झाला.
तिने कर्नाटकातील राजाजीनगर येथील नॅशनल पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले,
दिविताने मुंबईच्या सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून ग्रॅज्युएशन केले आहे.
ती व्यवसायाने एक मॉडेल तसेच आर्किटेक्ट आहे.
25 वर्षीय दिविता रायला बॅडमिंटन आणि बास्केटबॉल खेळायला आवडते.
तिला चित्रकला आणि संगीताचीही आवड आहे.
दिविताचे वडील इंडियन ऑईलमध्ये काम करतात.
दिविताने मिस दिवा युनिव्हर्स 2022 चा खिताब जिंकला आहे.