रणबीर कपूर आणि आलिया भट्ट शुक्रवारी सकाळी त्यांच्या घराखाली मुलगी राहा कपूरसोबत स्पॉट झाले आहेत.

आलिया-रणबीरचे राहासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हायरल फोटोमध्ये आलियाने राहाला कडेवर घेतलेलं दिसत आहे.

आलियाने लाडक्या लेकीची झलक दाखवली असली तरी अद्याप तिने चेहरा दाखवलेला नाही.

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये राहाने गुलाबी रंगाचा गोड ड्रेस घातला आहे.

आलियाच्या लेकीचं नाव नीतू कपूरने 'राहा' असं ठेवलं आहे.

लेकीच्या जन्मानंतर आलियाने फिटनेसवर लक्ष दिलं आहे.

आलियाचा 'ब्रम्हास्त्र' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

आलिया लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात रणवीर सिंहसोबत दिसणार आहे.

आलियाचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.