'रंग माझा वेगळा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे.

आपापसातले हेवेदावे विसरुन दीपा-कार्तिक पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत.

मेहंदी, हळद आणि संगीत साग्रसंगीत पद्धतीने पार पडल्यानंतर आता विवाहसोहळ्याकडे साऱ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

दीपा-कार्तिकचा मेहंदी, हळद आणि संगीत सोहळ्यातला लूक भाव खाऊन गेला.

लग्नामध्येही संपूर्ण कुटुंब पारंपरिक मराठमोळा पोशाख परिधान करणार आहेत.

'रंग माझा वेगळा' या मालिकेत दीपा-कार्तिकच्या लग्नात पैठणीची थीम आहे.

दीपा-कार्तिकच्या लग्नाची धामधूम सुरू असली तरी लग्नात विघ्न आणण्याचा प्रयत्न आयेषा शेवटपर्यंत करणार आहे.

दीपा-कार्तिकचा विवाहसोहळा रात्री आठ वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'रंग माझा वेगळा'च्या संपूर्ण परिवाराची पारंपरिक मराठमोळ्या पोशाखाला पसंती दर्शवली आहे.

गेले कित्येक दिवस ज्या दिवसाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो दिवस अखेर दीपा-कार्तिकच्या आयुष्यात आला आहे.