उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या मुंबईतील शासकीय निवासस्थानी आज गणरायाचं आगमन झालं. फडणवीस कुटुंबीयांनी गणपतीची विधिवत पूजा केली आणि आरतीही केली.
कोरोना काळानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजारा होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे.
फडणवीस कुटुंबीयांनी गणपतीची विधिवत पूजा केली आणि आरतीही केली.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
यादरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि फडणवीसांचे कुटुंबिय उपस्थित होते.
फडणवीसांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सकाळी शुभेच्छा दिल्या
राज्यावरचं आणि देशावरचं संकट दूर व्हावं असं साकडं फडणवीस यांनी यावेळी घातलं.