हिरवळीने बहरलेला निसर्ग पाहायचं असेल तर पावसाळ्यात कोकणातील नक्कीच भेट द्या.



श्रावणात कोकणात ऊन पावसाचा खेळ आणि निसर्गाचे खुललेलं रुप अनुभवायला मिळतं.



उंच डोंगरावरुन मनमुरादपणे कोसळणारे अनेक धबधबे आतापर्यंत तुम्ही पाहिले असतील.



मात्र कोकणात एक असा धबधबा आहे, ज्या धबधब्याचं सौदर्य दोन्ही बाजूंनी पाहता येतो.



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीजवळील कुंभवडे गावात असलेला बाबा धबधबा.



या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे गुहेत राहून किंवा समोरुन अशा दोन्ही बाजूंनी पांढराशुभ्र फेसाळत कोसळताना पाहायला मिळतो.



खरंतर हा नैसर्गिक धबधबा नसून तो तशा पद्धतीने बनवला गेलेला धबधबा आहे.



150 ते 200 फुटांवरुन शंकराच्या जटेतून जशी गंगा वाहते तशा पद्धतीने हा धबधबा कोसळत आहे.



हिरव्यागार निसर्ग आणि त्यातून वाहणारे धबधबे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतात.