अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज देशाचं बजेट संसदेत मांडलं. (Photo Credit : PTI)



या खास प्रसंगी जाणून घेऊया अर्थमंत्री निर्मला सितारमण या किती शिक्षित आहेत. (Photo Credit : PTI)



निर्मला सितारमण यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 ला तमिळनाडूमधील मदुराई येथील अय्यंगार कुटुंबात झाला होता. (Photo Credit : PTI)



निर्मला सितारमण यांनी मद्रास आणि तिरूचिरापल्ली येथून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. (Photo Credit : PTI)



1980 मध्ये त्यांनी सितालक्ष्मी रामास्वामी कॉलेज, तिरूचिरापल्ली मध्ये अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. (Photo Credit : PTI)



1984 मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात एम. ए. आणि एम. फिल मधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. (Photo Credit : PTI)



त्यांनी भारत - युरोप व्यापारावर लक्ष केंद्रीत करून अर्थशास्त्रात पी.एच.डी साठी प्रवेश घेतला होता. (Photo Credit : PTI)



परंतु या दरम्यान त्या लंडनला गेल्या आणि त्या पी.एच.डी. पूर्ण करू शकल्या नाहीत. (Photo Credit : PTI)



निर्मला सितारमण यांनी 2008 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. (Photo Credit : PTI)



त्यावेळी त्या भारतीय जनता पार्टीमध्ये एक सदस्य म्हणून सहभागी झाल्या होत्या.(Photo Credit : PTI)