चुंबन (Kiss) आणि प्रेमाचे (Love) गहण नातं आहे. चुंबन घेणे ही जणू प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बनली आहे.



विशेषत: ओठांवर चुंबन घेणे हे प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. जगात सर्वात पहिलं किस कुणी केलं आणि का असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे.



किसची सुरुवात फ्रेंच जोडप्यापासून झाली असावी, असे म्हटले जाते. तर किसची सुरुवात भारतातून सुरू झाले आणि त्यानंतर हे जगभर पसरलं, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.



चुंबन घेणे म्हणजे किस करण्याला सुरुवात कशी आणि कुठून झाली असावी याबद्दल शास्त्रज्ञांकडून वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले आहेत.



बहुतेक शास्त्रज्ञांच्या मते, जगातील सर्वात पहिलं किस एक अपघात झाला असावा. हा अपघात लोकांना आवडला आणि त्यानंतर किस घेणे प्रचलित झालं, असं म्हटलं जातं.



एका संशोधनानुसार, मानव एकमेकांच्या जवळ जाऊन वास घेण्याचा प्रयत्न करत असताना अपघाताने त्यांनी एकमेकांचे चुंबन घेतले असावे, असा दावा करण्यात आला आहे.



या दाव्यात तथ्य असल्याचे म्हटले जाते, कारण जुन्या काळी एकमेकांना भेटताना त्यांच्या वास घेण्याची प्रथा होती, असे म्हटले जाते.



काही शास्त्रज्ञांच्या मते, किस करण्याची पद्धत प्राण्यापासून आलेली असावी, असं म्हटलं जातं. काही प्राणी त्यांच्या मुलांना तोंडाद्वारे अन्न भरवतात.



याला प्रीमॅस्टिकेशन फूड ट्रान्सफर म्हणतात. यापासूनच मानवामध्ये चुंबन प्रचलित झालं असावे, असे काहीचं मत आहे.



काही शास्त्रज्ञांच्या मते, चुंबनाची अशी सुरुवात भारतात झाल्याचे म्हटले जाते. त्यानंतर प्राचीन ग्रीक लोक भारतात आले आणि परत जाताना त्यांनी चुंबन घेण्याची संकल्पना घेऊन त्यांच्यामार्फत ती जगभरात पसरली, असाही दावा आहे.