वजन कमी करण्यासाठी डाएटिंग ही चांगली गोष्ट आहे, पण डायटिंग म्हणजे उपाशी राहणे नाही.
जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुमचे लक्ष जंक आणि प्रोसेस्ड फूडकडे वळते
अशावेळी तुम्ही तुमच्या आहारात हेल्दी, चविष्ट आणि कमी कॅलरी स्नॅक्सचा समावेश करा
पॉप कॉर्न वजन कमी करण्यास पॉप कॉर्न देखील मदत करते. पॉप कॉर्नमध्ये खूप कमी कॅलरीज असतात. यामुळे भूक शांत होते.
जर तुम्हाला हेल्दी आणि मसालेदार खायचे असेल तर तुम्ही भाजलेले मटार खाऊ शकता. मटारमध्ये अनेक जीवनसत्त्वे आढळतात.
भाजलेले चणे खाल्ल्याने भरपूर प्रथिने आणि फायबर मिळतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
भाजलेले बदाम तुम्हाला डायटिंगमध्येही मदत करेल. बदाम खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळते. हेल्दी स्नॅक म्हणून तुम्ही बदाम खाऊ शकता.
मखनामध्ये उष्मांक खूप कमी असतात तर सोडियमचे प्रमाण जास्त, ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी आहे. मखनामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही पुरेसे असते. भूक लागल्यावर भाजलेले मखना खाऊ शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा फक्त माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.