रणवीर-दीपिकाचं रोमँटिक सेलिब्रेशन, मोनोक्रोम फोटो व्हायरल सुपरस्टार रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाला 14 नोव्हेंबरला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. रणवीर दीपिकाने चाहत्यांसह एकत्र घालवलेल्या काही सुंदर क्षणांचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्तराखंडला गेले होते व्यस्त शूटिंगमधून ब्रेक घेऊन रणवीर-दीपिका उत्तराखंडला पोहोचले होते या फोटोमध्ये, हे जोडपे स्टारडम सोडून साधेपणाने दूर निसर्गांत क्षण घालवताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना दीपिका पादुकोणने सांगितलं कि हे सर्व फोटो रणवीरने क्लिक केले आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांची गणना बॉलिवूडमधील टॉप पॉवर कपल्समध्ये केली जाते. त्यांचं लग्न 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटली मध्ये झालं होतं रणवीर-दीपिकाचं रोमँटिक सेलिब्रेशन