आज देशात काही भागात पाऊस तर काही ठिकाणी बर्फवृष्टी पाहायला मिळेल. (Photo Credit : unsplash)



भारतीय हवामान खात्याने (IMD) ताज्या हवामान अंदाजात म्हटलं आहे की, (Photo Credit : unsplash)



आज पंजाब, हरियाणा-चंडीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये गडगडाटी, वादळी वारे आणि गारपिटीसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह आसपासच्या परिसरातही आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Photo Credit : unsplash)



काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे. (Photo Credit : unsplash)



जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, हिमाचल प्रदेशात गडगडाटी वादळी वारा आणि हिमवृष्टी होण्याचीही दाट शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



उत्तर भारतात पावसानंतर पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे. (Photo Credit : unsplash)



ईशान्येकडील राज्यांमध्ये आज पावसासोबतच गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. (Photo Credit : unsplash)



आज ओडिशा, आसाम आणि मेघालयमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



आज पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीसह गारपीट होण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)