हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तर राजस्थान आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान 9 ते 12 डिग्री सेल्सियस दरम्यान आहे. (Photo Credit : unsplash)



याशिवाय, देशाच्या उत्तरेकडील भागात ते सामान्यपेक्षा जास्त आहे. (Photo Credit : unsplash)



आज फुरसातगंज येथे 1.0 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. (Photo Credit : unsplash)



जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा-चंदीगड-दिल्ली येथे बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. (Photo Credit : unsplash)



पंजाब, अरुणाचल प्रदेश, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी, उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम आणि मेघालय, तमिळनाडू आणि केरळ आणि माहे येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. (Photo Credit : unsplash)



2 ,3 आणि 5 फेब्रुवारी दरम्यान जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



हिमाचल प्रदेश आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्लीत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासात उत्तर-पश्चिम भारतात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



यानंतर 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान उत्तर-पश्चिम भारतात पावसाची आणखी एक फेरी सुरु राहण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)