होळी आधी वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. इतकंच नाही होळीनंतरही हवामानात बदल होणार आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) याबाबत माहिती दिली आहे. देशाच्या राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी हलक्या ऊन्हाच्या लहरी येण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तसेच पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, 6 ते 8 मार्च दरम्यान, मध्य आणि पश्चिम भारतात गडगडाटी वादळासह पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात येत्या दोन-तीन दिवसांत कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता असून त्यानंतर 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
मात्र, येत्या 15 दिवसांत देशाच्या इतर भागांतील कमाल तापमानावर कोणताही विशेष परिणाम होणार नाही, असा अंदाज IMD ने वर्तवला आहे.
दिल्लीत हवामान सामान्य राहण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात कमाल तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 ते 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
6 ते 7 मार्चला मध्य महाराष्ट्र, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमधील काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.