भारतात खुप सारे रहस्यमयी ठिकाणं आहेत. या रहस्यमयी ठिकाणांपैकी ओडिशामधील 'चांदीपूरचा समुद्र' देखील आहे. या ठिकाणचा समुद्र किनारा बाकी समुद्र किनाऱ्यांपेक्षा वेगळा आहे. ओडिशा राज्यातील बालासोर गावाच्या जवळ चांदीपूरचा समुद्रकिनारा आहे. चांदीपूर समुद्रकिनाऱ्यावरील पाणी सतत अदृश्य होत राहते. आणि हे गायब झालेले पाणी काही वेळाने अचानक नजरेस येते. हे पाणी गायब होऊन अचानक परत दिसणारं दृश्य अद्भूत आहे. या समुद्र किनाऱ्याला 'Hide and Seek Beach' देखील म्हटलं जातं. समुद्रतटाकरिता अशी घटना अद्वितीय मानली जाते. या किनाऱ्यावर ओहोटीची निश्चित अशी वेळ नाही.