बार्शीत वृक्ष संवर्धन समिती तर्फे किल्ले बांधणी स्पर्धेला चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!



दिवाळीचा सण म्हणजे सर्व बाळगोपाळांना आणि मोठ्यांनाही आनंदाचा सोहळा



अशा या आनंदाच्या सोहळ्यात “दिवाळी किल्ला” बनवणे ही तर मोठी पर्वणीच



आणि जर का हा किल्ला शिवरायांचा ऐतिहासिक किल्ला असेल तर हा योग काय वर्णावा.........!



अश्यातच किल्ला करायला मुलांना उत्साह मिळावा म्हणून काही संस्था देखील दिवाळीत वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करतात



मराठमोळी मंडळी तर आवर्जून दिवाळीत किल्ले करण्यात मागे हटत नाही, अश्यातच अमराठी राज्यात देखील किल्ले बांधणी स्पर्धा घेतल्या जातात



अश्याच काही चिमुकल्यानी साकार केलेले किल्ले सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत



लहान मुलांना सहकार्य करण्यासाठी तरुण मुले आणि पालकवर्ग सहकार्य करतात



वृक्षसंवर्धन समिती बार्शी.. आयोजित

किल्ला शिवरायांचा किल्ले बांधणी स्पर्धा - 2022