IPL 2023 Sikandar Raza : 'सिकंदर'चा ऐतिहासिक कारनामा, आयपीएलमध्ये अर्धशतकं ठोकणारा झिम्बाब्वेचा पहिला क्रिकेटर
आयपीएल 2023 मधील सामन्यात पंजाब किंग्सचा संघ लखनौ सुपर जायंट्सवर वरचढ ठरला. पंजाब किंग्जने रोमहर्षक लढतीत लखनौ सुपर जायंट्सचा दोन गडी राखून पराभव केला.
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात सिकंदर रझाने उत्तम गोलंदाजी आणि फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
लखनौविरुद्धच्या सामन्यात पंजाबसमोर विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य होतं. हे लक्ष्य पंजाबनं शेवटच्या षटकात पूर्ण केलं.
पंजाब किंग्जकडून सिकंदर रझाने अप्रतिम खेळ दाखवत 57 धावांची चमकदार खेळी केली. यामुळेच अटीतटीच्या लढतीत पंजाबने लखनौवर दोन विकेटने विजय मिळवला.
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात सिकंदर रझाने शानदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. गोलंदाजी करताना रझाने 2 षटकांमध्ये 19 धावा देऊन एक बळी घेतला.
दुसरीकडे फलंदाजी करताना त्याने 41 चेंडूत 57 धावांची दमदार खेळी केली. यावेळी त्याने 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
दुसरीकडे फलंदाजी करताना त्याने 41 चेंडूत 57 धावांची दमदार खेळी केली. यावेळी त्याने 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
सिकंदर रझा हा आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा झिम्बाब्वेचा पहिला खेळाडू ठरला आहे. तो या सामन्यात सामनावीर ठरला.
सिकंदर रझा हा आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा झिम्बाब्वेचा पहिला खेळाडू ठरला आहे. तो या सामन्यात सामनावीर ठरला.
सिकंदर रझा हा आयपीएलमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा पहिला झिम्बाब्वेचा क्रिकेटर आहे.
सिकंदर रझा हा आयपीएलमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा पहिला झिम्बाब्वेचा क्रिकेटर आहे.
रझाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सध्याच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक असल्याचं सिद्ध केलं आहे.
रझाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सध्याच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक असल्याचं सिद्ध केलं आहे.