दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपचा विक्रांत रोणा हा चित्रपट 28 जुलै रोजी रिलीज झाला आहे.



विक्रांत रोणा हा चित्रपट रिलीज होऊन दहा दिवस झाले आहेत. पण तरी देखील विक्रांत रोणा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...



जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'विक्रांत रोणा' या चित्रपटानं 150 कोटींचा टप्पा गाठला आहे.



या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं 8.14 कोटींची कमाई केली आहे.



ओपनिंग-डेला या चित्रपटानं 1.11 कोटींची कमाई केली. एका रिपोर्टनुसार, विक्रांत रोणा या चित्रपटानं दहाव्या दिवशी तीन कोटींची कमाई केली.



लवकरच हा चित्रपट 200 कोटी क्लबमध्ये सामील होईल, असंही म्हटलं जात आहे.



‘विक्रांत रोणा’ ही एका गावाची कहाणी आहे, जिथे राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.



किच्चा सुदीपसोबतच 'विक्रांत रोणा' या चित्रपटामध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.



निरुप भंडारी, नीता अशोक, रविशंकर गौडा, मधुसूदन राव आणि वासुकी वैभव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहेत.



हा चित्रपट इंग्रजी, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित आहे.