शेती तंत्रज्ञानातील कंपनी 'ए एस अ‍ॅग्री' आणि 'अ‍ॅक्वा एलएलपी' अत्याधुनिक व्हर्टिकल फार्मिंग क्लस्टर प्रकल्प सादर करणार आहे.

कर्जत येथील एन.डी.स्टुडिओमध्ये ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान साजऱ्या होणाऱ्या 'महा उत्सव'मध्ये हा प्रकल्प पाहता येणार आहे.

या प्रकल्पाचा लाभ महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना होईल असा दावा केला जात आहे.

या प्रकल्पाचा लाभ महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना होईल असा दावा केला जात आहे.

व्हर्टिकल फार्मिंग पद्धतीद्वारे हळदीच्या क्रांतिकारक उत्पादनाबाबत जागरूकता निर्माण केली जाईल.

हा देशातील नेक्स्ट जनरेशन अर्बन फार्मिंग प्रोजेक्ट असून ज्यामध्ये पॉलीहाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय हळदीचे उत्पादन केले जाईल.

हा देशातील नेक्स्ट जनरेशन अर्बन फार्मिंग प्रोजेक्ट असून ज्यामध्ये पॉलीहाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय हळदीचे उत्पादन केले जाईल.

शेतकऱ्यांमध्ये शेतीचे ज्ञान अधिक वाढावे आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात हा देखील यामागे एक उद्देश आहे.

कौशल्य-आधारित प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कार्यक्रमही यावेळी पार पडणार आहे.

कौशल्य-आधारित प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कार्यक्रमही यावेळी पार पडणार आहे.

नाविन्यपूर्ण सॉईल बेस्ड व्हर्टिकल फार्मिंग प्रकल्प कोकण, रायगड, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देईल.

नाविन्यपूर्ण सॉईल बेस्ड व्हर्टिकल फार्मिंग प्रकल्प कोकण, रायगड, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देईल.

हा क्लस्टर फार्मिंग प्रकल्प शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आहे असे 'ए एस अ‍ॅग्री' आणि 'अ‍ॅक्वा एलएलपी'चे अध्यक्ष डॉ. प्रशांत झाडे यांनी म्हटलं आहे.

या माध्यमातून आम्ही अ‍ॅग्रो टुरिझमला प्रमोट करणार असून स्टार्टअप, विविध भागातील शेतकरी यांच्यासह कार्य करण्यास उत्सुक आहोत, असे आयोजक नितीन चंद्रकांत देसाईंनी म्हटलंय.