बीट हिवाळ्यातील सर्वात आरोग्यदायी भाज्यांपैकी एक आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे अनेक फायदे आहेत.
बीटचा रस प्यायल्याने तुमचे वजनही नियंत्रणात राहते. या व्यतिरिक्त, बीट तुमच्या त्वचेसाठी रामबाण उपाय आहे.
गाजर ही हिवाळ्यातील एक आरोग्यदायी भाजी आहे. त्याचा रस रोज प्यायल्याने तुमची त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी राहते.
गाजरचा रस रोज प्यायल्याने पचन सुधारते आणि तुमचे वजन नियंत्रित राहते.
काकडी ही प्रत्येक ऋतूत उपलब्ध होणारी भाजी आहे. त्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते.
काकडीचा रस प्यायल्याने त्वचेमध्ये कोरडेपणा येत नाही. तसेच त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होत नाही, त्यामुळे पिंपल्सची समस्या उद्भवत नाही.
टोमॅटोच्या वापराने आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते आणि व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
पालकचा रस प्यायल्याने त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते जे आपल्या त्वचेला मदत करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.