सिताफळ हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे फळ आहे. सिताफळ खाणे हे आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे. सीताफळात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन हे घटक आढळतात. सीताफळात व्हिटॅमिन सी असल्याने ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. सिताफळ खाणे हे हृदयासाठी फायदेशीर मानले जाते. तसेच सीताफळाचे सेवन केल्यास माधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. दररोज सिताफळ खाल्याने दात, हिरड्यांचा होणारा त्रासही कमी होऊ शकतो. सीताफळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. सीताफळाचे सेवन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तसेच निरोगी त्वचा आणि केसांसाठी देखील सीताफळ फायदेशीर ठरते.