चहा अनेकांना जीव की प्राण असतो. चहा प्रेमी चहाची तलफ भागवण्यासाठी काय करतील याचा नेम नाही.
अनेकांच्या दिवसाची सुरुवात वाफाळत्या चहाने होते.
एक चहा दिवसभराचा थकवा दूर करतो, तर ताजंतवानं राहण्यासाठी चहा प्यायला जातो.
जेवल्यानंतर चहा पिणं बऱ्याच जणांना आवडतं. पण ही सवय प्रकृतीला घातक ठरु शकते.
जेवणानंतर तातडीने चहा पिणं आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही.
चहा पावडरमध्ये आम्ल पदार्थ असतात. हे पदार्थ अन्नातील प्रोटीनमध्ये मिसळतात.
यामुळे प्रोटीन टणक बनतात, परिणामी ते पचायलं जड जातं.
यामुळे जेवल्यानंतर तातडीने चहा पिणं टाळावं, असं तज्ञ सांगतात.