आता ‘लॉक अप’ या शोमध्ये करण कुंद्रासोबत त्याची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश देखील ‘वॉर्डन’च्या भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूड ‘पंगा क्वीन’ कंगना रनौतचा रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ आता अंतिम टप्प्यात आहे. या शोमध्ये स्पर्धक एकापाठोपाठ एक आपली गुपित उघड करत आहेत. तेजस्वी प्रकाश देखील ‘वॉर्डन’च्या भूमिकेत दिसणार आहे. ALTBalaji ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर याची घोषणा केली आहे. शुक्रवारी प्रसारित झालेल्या शोच्या विशेष भागाचा टीझर बुधवारी ALTBalaji ने शेअर केला. या शोमध्ये तेजस्वी लॉक अपमध्ये प्रवेश करताना दाखवण्यात आली आहे. करण कुंद्राने मार्चमध्ये जेलरच्या भूमिकेत या शोमध्ये प्रवेश केला होता. या शोमध्ये तो स्पर्धकांना अनेक टास्क करायला लावतो आणि त्यांच्याकडून आणखी काही चूक झाली, तर स्पर्धकाची चांगली शाळाही घेतो. करण आणि तेजस्वीच्या चाहत्यांना या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे.