अभिनेता वरुण धवन आणि नवोदित अभिनेत्री सारा अली खान यांचे जवळचे नाते आहे. दोघांनी डेव्हिड धवनच्या 'कुली नंबर 1' मध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता लवकरच ते पुन्हा एका प्रोजेक्टसाठी एकत्र येण्याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या सारा आणि वरुण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी गोव्यात आहेत. रविवारी दोघांनी इंस्टाग्रामवर एक मस्त सेल्फी शेअर केली आहे. दोघेही बीचवर पोज देताना दिसत आहेत. फोटोमध्ये सारा लाल रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे तर वरुण शर्टलेस आहे. फोटोमध्ये त्यांनी सूर्य आणि लाटांचे इमोजी टाकले आहेत. सारा आणि वरूण दोघांनी देखील हे फोटो आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.