बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'दृश्यम 2' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून अभिनेत्री खूप आनंदी आहे. या चित्रपटात इशिताने अजय देवगणची मुलगी अंजू साळगावकरची भूमिका साकारली आहे. इशिता चित्रपटात निरागस दिसत असली तरी इंस्टाग्रामवर तिचे आकर्षण पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. फ्लोरल ड्रेस, मोकळे कुरळे केस आणि रुंद टेप हिल्समध्ये इशिता खूपच स्टायलिश दिसत आहे. सुपर कूल फोटो शेअर करताना इशिताने एक मजेदार कॅप्शन दिले आहे. प्रतिसाद पाहून माझे हृदय शा ला ला करत आहे. इन्स्टावर फिकट गुलाबी रंगाच्या या सुपर ड्रेसमध्ये इशिताने तिच्या ग्लॅमरस अवताराने सर्वांना थक्क केले. निष्पाप चेहऱ्याची इशिता या फोटोंमध्ये किलरची पोज देताना दिसत आहे. इशिताने आपला आनंद साजरा करत अललेले फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. किलर पोजसह तिचे हास्य चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारं आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला मिळालेले यश पाहून अभिनेत्री खूपच उत्साहित दिसत आहे.