'व्हॅलेंटाईन वीक'चा आजचा तिसरा दिवस आहे. हा दिवस चॉकलेट डे (Chocolate Day) म्हणून साजरा केला जातो.
'चॉकलेट डे' च्या दिवशी प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता.
चॉकलेटमध्ये विशिष्ट प्रमाणात सेरोटोनिन, न्यूरोट्रांसमीटर आणि ट्रिप्टोफॅन असते, जे तुमचं मन प्रसन्न करते. मानसिक स्वास्थ देखील चॉकलेट खाल्ल्यानं चांगले राहते.
हॉट चॉकलेट मिल्क तसेच व्हाईट चॉकलेट, चॉकलेट आईस्क्रिम हे चॉकलेटचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.
योग्य प्रमाणात चॉकलेट खाल्ल्यानं वजन देखील कमी होतं, असं कॅलिफोर्नियाच्या सॅन डिगो विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनामुळे स्पष्ट झालं.
डार्क चॉकलेट रक्त प्रवाह सुधारते ज्यामुळे शरीरात योग्य ऑक्सिजन पोहोचतो.
डार्क चॉकलेटमुळे हृदयाचे आजार कमी होतात, असेही काही संशोधनातून समोर आले आहे.