साडीत खुललं वैदेहीचं सौंदर्य; पाहा फोटो दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. वैदेही अभिनयासह नृत्य कलेतही पारंगत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली वैदेही नेहमीच तिचे वेगवेगळे लूक चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. वैदेहीने नुकतेच तिच्या एका खास लूक मधले फोटो शेअर केले आहेत. निळ्या साडीतला तिचा हा हटके लूक फार सुंदर दिसतोय. वैदेहीचा हा सिम्पल आणि सुंदर लूक चाहत्यांच्या खास पसंतीस पडलाय, चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.