अनेक लोक मेकअप (Makeup) करताना विविध प्रकारची क्रिम, पावडर, आयलायनर, लिपस्टिकचा वापरतात



ब्युटी प्रोडक्ट चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवल्याने काय नुकसान होऊ शकते? मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल जाणून घेऊयात...



लिपस्टिक लावल्याने तुमचे ओठ काळे होतात. तसेच ओठ कोरडे देखील पडतात. त्यामुळे मेकअप करताना नेहमी ब्रँडेड लिपस्टिक लावावी.



त्वचेवरील डाग लपवण्यासाठी महिला या बर्‍याचदा मेकअप करताना कन्सीलरचा वापर करतात. कन्सीलरचा जास्त वापर केल्याने तुमची त्वचा खराब होऊ शकते.



अनेकांना रोज मेकअप करण्याची सवय असते. घरी आल्यावर रोज मेकअप रिमूव्हरनं मेकअप काढावा. जर तुम्ही चेहऱ्यावर तसाच मेकअप ठेवून झोपलात तर तुमची त्वचा खराब होईल.



जास्त प्रमाणात स्पा घेतल्याने त्वचेचे नुकसानही होऊ शकते. सतत स्पा केल्यानं त्वचेची नॅचरल ग्लो निघून जातो. तसेच चेहऱ्यावर पिंपल्स देखील येऊ शकतात.



पिंपल्स फोडल्यानं बॅक्टेरिया आणि घाण त्वचेच्या छिद्रांमध्ये जातात, ज्यामुळे त्वचेवर कायमचे डाग पडतात.



मेकअप करण्याआधी आणि मेकअप केल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं धुवा. तुम्ही चेहऱ्याला मुलतानी मातीचा किंवा हळदीचा फेसपॅक लावू शकता.



मुलतानी माती गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला फेस पॅक म्हणून लावू शकता. या पॅकमुळे तुमच्या स्किनवर ग्लो येतो आणि चेहऱ्यचा तेलकटपणा देखील कमी होतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे