अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.



'बिग बॉस'मध्ये पुनीत सुपरस्टारने गोंधळ घातला होता.



याच कारणाने त्याला या कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलं.



अशातच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



पुनीतने उर्फीला लग्नाची मागणी घातली आहे.



पुनीत उर्फीला लग्न करण्यासाठी हात जोडत विनंती करत आहे.



उर्फी जावेद तिच्या अतरंगी ड्रेसिंगमुळे नेहमीच चर्चेत असते.



तर दुसरीकडे पुनीत सुपरस्टार वादग्रस्त वक्तव्यामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो.



त्याच्या याच गोष्टीमुळे 'बिग बॉस'च्या घरातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.



पुनीत हा लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुयंसर आणि युट्यूबर आहे.