अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला! श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं! हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात आलीये. अवघ्या 47 व्या वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका आला. श्रेयस तळपदे आज 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे शूटिंग करत होता आणि शूटिंग संपल्यानंतर तो घरी पोहोचला तेव्हा त्याला छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या अँजिओप्लास्टीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. श्रेयस तळपदे या मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीला नावाजलेला अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. दरम्यान श्रेयसच्या प्रकृतीबाबतच्या या बातमीने सर्वांनाच धक्का बसला असल्याचं सांगण्यात येत आहे.