सावधान! आयसीयूमधील रुग्णांची संख्या वाढतीच, ओमायक्रॉनला हलक्यात घेण्याची चूक पडू शकते भारी इंसाकॉग (Insacog) संस्थेने कोरोना संसर्ग आणि ओमायक्रॉनबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे भारतात आयसीयूमध्ये भरती रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे इन्साकॉगच्या अहवालात असेही म्हटले आहे की, ओमायक्रॉनच्या BA.2 या उपप्रकारामुळे संसर्ग वेगाने पसरत आहे या अहवालात असे समोर आले आहे की, आयसीयूमधील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे या अहवालातील सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे, ओमायक्रॉन भारतात सामुदायिक प्रसाराच्या पातळीवर पोहोचला आहे विशेषत: दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांमध्ये त्याचा प्रसार झपाट्याने झाला आहे संसर्ग झालेल्या लोकांमध्ये ज्यांना कोविडची लस मिळालेली नाही किंवा ज्यांना दोन्ही डोस मिळालेले नाहीत असे लोक अधिक आहेत