ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नव्या CEO ची म्हणजेच, मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) ची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, ट्विटर कंपनीचा नवा सीईओ कुणीही व्यक्ती नसून हा एक कुत्रा आहे. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नव्या सीईओचा फोटो पोस्ट करत ट्वीट केलं आहे. मस्क यांनी त्यांचा पाळीव कुत्रा फ्लोकी ट्विटरचा नवा सीईओ असल्याचं ट्वीट केलं आहे. मस्क यांनी त्यांचा लाडका कुत्रा फ्लोकीचा CEO च्या खूर्चीवर बसलेला फोटो शेअर करत ट्वीट केलं आहे. एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, ट्विटरचा नवीन सीईओ फार चांगला आहे. इतकंच नाही तर मस्क यांनी फ्लोकी इतर माणसांपेक्षा चांगला असल्याचं म्हटलं आहे. मस्क यांनी दुसरा फोटो ट्वीट करत ट्विटरच्या नव्या सीईओच्या स्टाईलचं कौतुक केलं आहे. फ्लोकीची स्टाईल भारी असल्याचं मस्क यांनी म्हटलं आहे. मस्क यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अनेक युजर्सनी या फोटोला लाईक आणि शेअर तसेच रिट्विटही केलं आहे. युजर्स कमेंट करत फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एलॉन मस्क ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. मस्क नेहमी असे गंमतीशीर ट्वीट करत असतात. त्यामुळे नेटकरी मस्क यांच्या खोडकर शैलीत ट्वीटची मजा घेताना दिसत आहेत.